ठाकरेंनंतर शिंदे गटाची 'ढाल-तलवार' वादात

शीख समाजाचा विरोध
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 15, 2022 12:16 PM
views 634  views

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल-तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला आहे सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याकारणानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारलं याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं द्यायला नको होतं. या संदर्भातील निर्णय नाही झाला तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. 

ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे. तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्यानं त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसं, निवेदनही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. .