इचलकरंजी : इचलकरंजी कोरोची येथे श्री विनायक सोनटक्के व सौ वनिता सोनटक्के यांच्या पापड व रोटी व्यवसायासाठी अत्याधुनिक मशीनचा आज २१ नोव्हेंबर २०२४ रोजी शुभारंभ झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अष्टपैलू अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अक्षता कांबळी यांच्या शुभ हस्ते पूजा व पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री दत्तात्रय देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. इचलकरंजी शहरात प्रथमच इतकं अत्याधुनिक मशीन आणण्यात आल आहे. या मशीनवर विविध प्रकारचे पापड,चपाती, रोटी हॉटेल व इतर व्यवसायिकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी परिसरातील सर्वांकडून सोनटक्के परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी अनिल कांबळी, चंद्रकांत भंडारी, गोपाळ सोनटक्के, मुरलीधर कांबळे, राहुल घट्टे, सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी, बाळासो पाटील, संदीप तोडकर, मंथन सोनटक्के, मंदार सोनटक्के, उर्मिला भंडारी, सविता सोनटक्के, रंजना कांबळे, मंगल देसाई, ज्योती पाटील, मंगल कांबळे, प्रणाली सोनटक्के, विनय सोनटक्के, सौरभ पाटील इत्यादी मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होते.