सिंधुदुर्ग : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा अच्युत सावंत-भोसले यांना 'महाराष्ट्र महागौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी या पुरस्काराची मुंबईत घोषणा केली. संघटनेचे पाहिले अधिवेशन २९ ला महाबळेश्वर इथं होत असून महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोंसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वितरण होणार असून भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोकणाच नाव जगभरात पोहचणारे, शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे BKC ब्रॅण्डचे शिल्पकार अच्युत सावंत-भोसले यांचा 'महाराष्ट्र महागौरव पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीकडून अच्युत सावंत-भोसले यांच अभिनंदन करण्यात आले आहे.