राजापुरात ट्रक कारचा अपघात

एक ठार तर पाच जखमी
Edited by:
Published on: September 05, 2025 19:19 PM
views 5080  views

राजापूर : मुंबई - गोवा महामार्गांवरील राजापुर हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्राच्या गाडीने जोरदार धडक देवून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुुपारी घडली.  या अपघातामध्ये राजेश शेखर नायडू (वय ३४ रा. मालाड पश्चिम मुंबई) हे जागीच ठार झाले आहेत. तर, या कार मधील अन्य पाच जण जखमी झाले. या अपघातातील जखमींवर राजापूर रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.