दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पाळये जवळ दुर्मीळ असा भारतीय तारा कासव आढळून आला.
पाळये येथील उद्योजक सुभाष दळवी यांना अतिशय दुर्मिळ असा तारा कासव दिसून आला. त्यांनी दोडामार्ग वनविभागाच्या स्वाधीन केलंय.
हा तारा कासव पाहण्यासाठी प्राणीमित्रांनी ठिकाणी गर्दी केली होती. भारत आणि श्रीलंकेत हे तारा कासव आढळते. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ते दुर्मिळ प्रजाती असल्याची माहिती प्राणीमित्रानी दिली.
या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
दक्षिण भारतामध्ये आढळणारे इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच ती जवळ बाळगण्यास बंदी आहे.