LIVE UPDATES

मातोंड सावंतवाड्यातील ग्रामस्थांचा नवा आदर्श

जलसंधारणासाठी केली चक्क तलावाची निर्मिती ; जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींनी भेट देत केले कौतुक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 13, 2026 16:54 PM
views 488  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला: तालुक्यातील मातोंड सावंतवाडा येथील ग्रामस्थांनी  एकत्र येत येथील भरभरेवाडी आणि गावडेवाडी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच मुंबईस्थित चाकरमानी  व मातोंड ग्रामपंचायतच्या सहकार्याने गावातील जलसंवर्धनाचा एक नवीन आदर्श जिल्ह्यात निर्माण केला आहे. डोंगर भागातून येणारे पाणी आपल्या भागात टिकून राहावे यासाठी छोट्या ओहोळानजिक मोठ्या तलावाची निर्मिती त्यांनी करून त्यात पाणीसाठा निर्माण केला आहे. विशेष म्हणचे या कार्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० हजार एवढा खर्च आला असून ग्रामस्थ, मुंबईस्थित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. 

   दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी या उपक्रमाला नुकतीच भेट देत ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पुढे याठिकाणी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पक्क्या बंधाऱ्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. 

यावेळी पंचायत समिती सभापती शंकर घारे, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, नगरसेवक दाजी परब, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, उपसरपंच वैभवी परब, पंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, माजी उपसरपंच सुभाष सावंत, आनंद परब, गीता सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुजाता सावंत, राहुल प्रभू, दिपेश परब, सोसायटी संचालक पप्पू सावंत, स्थानिक ग्रामस्थ काका सावंत, दशरथ सावंत  जिजी सावंत, गजानन सावंत, दादा भरभरे, विजय परब, काशीराम परब यांच्या सहित ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच यावेळी मातोंड सावंतवाडा ते भरभरेवाडी कडे जाणाऱ्या स्ट्रीट लाईटची मागणीही ग्रामस्थांकडून मनिष दळवी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी लवकरात लवकर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दळवी यांनी दिले.