साडे पाचशे जणांचं भव्य स्टेज, समोर 50 हजारहून अधिक जनसमुदाय ! आंगणेवाडीतली भाजपची सभा घडवणार इतिहास !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेट राहणार उपस्थित
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 30, 2023 17:22 PM
views 751  views

मालवण : दिल्लीपासून ते थेट गावपातळीपर्यंतच्या राजकीय संघर्षात सिंधुदुर्ग भाजपनं आपली विजयी घोडदौड कायम ठेवलीय. याच दैदीप्यमान राजकीय वाटचालीतला पुढचा टप्पा म्हणुन प्रसिध्द आंगणेवाडी यात्रेत भाजपची ऐतिहासिक महासभा होतेय. यासाठी अत्यंत लक्षवेधी असं स्टेज बनवण्यात आलंय. या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेट उपस्थित असेल. नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच तब्बल पन्नास हजारहून अधिक जणांच्या उपस्थितीत ही 'न भूतो न भविष्यती' अशी सभा पार पडणार आहे. 


पालमेंट से पंचायत तक असा नारा भाजपनं दिला आणि या एकाच मिशनवर सिंधुदुर्ग जिल्हयातल्या भाजप नेत्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काम केलं. जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह सहका-यांनी आपला करिष्मा दाखवला. याच विजयी वाटचालीचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजेच भाजपची ही आंगणेवाडी इथली सभा ठरणार आहे.


या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेट उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर नवनिर्वाचित सरपंच, पदाधिकारी यांचाही समावेश आहे. या सभेसाठी खास वैशिष्ठयपूर्ण असं स्टेज बनवण्यात आलंय, ज्या स्टेजवर तब्बल साडे पाचशे पदाधिकारी बसु शकतात. स्टेजच्या समोर तब्बल 50 हजारहून अधिक जनसमुदाय असेल. हे स्टेज फोर्थ डायमेंशन हि कंपनी उभारत असुन 180 बाय 80 आकाराचं आणि 50 फुट उंचीचं हे स्टेज आहे.


स्टेजवर एका बाजुला मंत्री, सरपंच, दुस-या बाजुला उपसरपंच व अन्य पदाधिकारी अशी एखाद्या राजदरबारासारखी अगदी वैशिष्ठयपुर्ण बैठकव्यवस्था करण्यात आलीय. सिंधुदुर्ग जिल्हयातील गड आणि किल्ले यावर आधारीत हे डिझाईन बनवण्यात आले असुन तब्बल 200 हुन अधिक कारागीर यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. एकुणच अशा वेगळया माहोलमुळे हि सभा सिंधुदुर्गातली  ऐतिहासिक सभा तर ठरणार आहेच, परंतु कोकणच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकंडुन या सभेत मोठया निधीची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. त्यासाठीही ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे.