भास्कर जाधव यांच्यावर पुण्यातही गुन्हा दाखल

कुडाळच्या सभेत केंद्रीय मंत्री राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे भोवले
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 20, 2022 09:00 AM
views 392  views

पुणे : कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने आमदार भास्कर सावंत यांच्यावर पुणे इथल्या डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंगटे यांनी ही फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे भास्कर जाधव यांनी प्रक्षोभक, सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि जाणीवपूर्वक अशांतता पसरवुन दंगे घडवुन आणणारे भाषण केले. त्यानुसार त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 153 अ, 505 1 ब, 505 2 500, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.