9 एके 9 | ’कोकणसाद’च्या कॅलेंडरचं प्रकाशन !

कोकणवासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 09, 2023 22:01 PM
views 391  views

सावंतवाडी : कोकणच्या भुमीतले सण आणि उत्सव यांची अचुक माहिती देण्यासाठी 9 वर्षांपूर्वी 'कोकणसाद'नं कॅलेंडर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. नऊ वर्षाच्या या अथक वाटचालीनंतर 9 वर्षांचा हा मुहूर्त साधण्यासाठी नवीन वर्षातल्या 9 तारखेला हे कॅलेडर प्रकाशित करण्यात आलं.  


आजचं कोकणसाद लाईव्ह म्हणजेच सुरवातीच सिंधुदुर्ग लाईव्ह. 9 वर्षांपूर्वी डिजिटल मिडीयाचं हे नवं पर्व सुरू करत असतानाच कोकणवासीयाना सण आणि उत्सव यांची अचुक माहिती समजायला हवी, यासाठी आम्ही कॅलेंडर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्हचं कोकणसाद लाईव्हमध्ये रूपांतर झालं. कोकणच पहिलं दैनिक कोकणसादही आता सोबत आहे. या परिपूर्ण मिडियाच्या माध्यमातून आता अवघ्या कोकणवासीयांना आपले सण, उत्सव याची माहिती देणारं कॅलेंडर सलग 9 व्या वर्षी आम्ही कोकणवासीयांच्या घराघरात पोहोचवत आहोत. आज नवव्या वर्षातलं हे कॅलेंडर शुभ तारखेला म्हणजेच 9 तारखेला प्रकाशित करण्यात आलं. 




सुरवातीला सावंतवाडीचं दैवत श्री पाटेकराच्या चरणी हे कॅलेंडर अर्पण करण्यात आलं. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत-भोंसले यांच्या हस्ते या कॅलेंडरच प्रकाशन झालं. यावेळी कोकणसाद लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण, ब्युरो चीफ संदीप देसाई, डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना कोकण विभाग अध्यक्ष सिताराम गावडे, सावंतवाडी प्रतिनीधी विनायक गांवस, पुरोहीत शरद सोमण आदी उपस्थित होते. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत-भोंसले यांच्या हस्ते या कॅलेंडरच प्रकाशन करण्यात आले. 


त्यानंतर ३६५ खेड्यांचा अधिपती  श्री देव उपरकर चरणी हे कॅलेंडर अर्पण करण्यात आल. यावेळी मानकरी विद्याधर शितप, शुभम शितप उपस्थित होते. तसेच नरेंद्र डोंगर येथील जागृत हनुमंताचरणी हे कॅलेंडर अर्पण करण्यात आल. यावेळी माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, रवी बांदेकर उपस्थित होते. तर उभाबाजार येथील दक्षिणाभिमुख मारूती मंदीरात हनुमंता चरणी हे कॅलेंडर अर्पण करण्यात आल. तसेच श्री देव महापुरुष चरणी हे कॅलेंडर अर्पण करत कोरोनानंतर येणार हे नववर्ष समाजातील प्रत्येक घटकाला सुखाच व भरभराटीच जावो अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर कणकवली इथले जागृत देवस्थान परमपुज्य श्री भालचंद्र बाबा यांच्या चरणीही हे कॅलेंडर अर्पण करण्यात आलं. यावेळी भालचंद्र महाराज संस्थान व्यवस्थापक विजय केळुसकर कोकणसादचे मुख्य संपादक  सागर चव्हाण, ब्युरो चीफ संदीप देसाई, जाहिरात प्रतिनिधी समीर सावंत कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे, संस्थांनचे सदस्य गजानन उपरकर, काणेकर, पारगावकर, कांबळी आदी उपस्थित होते.