गणेशोत्सवात शाळांना 7 दिवस सुट्टी

Edited by: स्वप्नील परब
Published on: July 30, 2025 16:48 PM
views 436  views

मुंबई : यंदाच्या ऑगस्ट २०२५ मध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना सुट्टींची मेजवानी मिळणार असून, विशेषतः मुंबई व कोकण विभागातील शाळांना गणेशोत्सवानिमित्त सलग सात दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी मुंबई व कोकण विभागातील शाळांना गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांसाठी सुट्टी असते. मात्र यंदा या सुट्ट्यांमध्ये दोन दिवसांची भर पडली असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी या विभागातील शाळांना २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ पर्यंत सलग सात दिवस गणेशोत्सवाची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील सर्व शाळांना ऑगस्टमध्ये पुढीलप्रमाणे सुट्ट्या असणार आहेत

९ ऑगस्ट २०२५ (शनिवार) - रक्षाबंधन निमित्त राज्यभरातील शाळा बंद.

१५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) - स्वातंत्र्य दिन व पारशी नववर्ष निमित्त शाळांना सुट्टी.

१६ ऑगस्ट २०२५ (शनिवार) - गोपाळकाला/दहीहंडी साजरी होणार; सर्व शाळांना सुट्टी.

२७ ऑगस्ट २०२५ (बुधवार) – गणेश चतुर्थी; सर्व शाळांना सुट्टी. मुंबई व कोकणातील शाळांना २ सप्टेंबरपर्यंत सलग सुट्टी.