भोसले पॉलिटेक्निकच्या 52 विद्यार्थ्यांची पुणे येथील प्रकल्पासाठी निवड

केएसपीजीचे कॅम्पस इंटरव्युव्हमध्ये करण्यात आलं सिलेक्शन
Edited by: विनायक गांवस
Published on: March 29, 2023 12:46 PM
views 250  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजी या वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले.

     कॉलेजच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये भोसले पॉलिटेक्निक बरोबरच शासकीय तंत्रनिकेतन, मालवण व एमआयटीएम,ओरोस येथील विद्यार्थीही सहभागी झाले होते. जिल्ह्यातील एकूण 91 विद्यार्थ्यांनी या इंटरव्ह्यू प्रक्रियेत भाग घेतला. ऑनलाइन टेस्ट व मुलाखतीनंतर 52 विद्यार्थ्यांची पुणे येथील प्रकल्पासाठी निवड करण्यात आली.

     इंटरव्ह्यू घेण्यासाठी कंपनीचे एचआर मॅनेजर श्रीकांत बोंगाळे, प्रॉडक्शन मॅनेजर आनंद मिश्रा, फॅक्टरी मॅनेजर पी.व्ही.संतोष, असिस्टंट मॅनेजर चेतन नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

     सर्व अधिकाऱ्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांच्या टॅलेंटचे विशेष कौतुक केले व असे इंटरव्ह्यू आयोजित करण्यासाठी भोसले पॉलिटेक्निक घेत असलेल्या पुढाकाराबद्दल संस्थेची प्रशंसा केली.

     ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी कॉलेजचे टीपीओ विभाग प्रमुख मिलिंद देसाई, महेश पाटील, राहुल गिर्याळकर, हवाबी शेख, सचिन लांजेकर व श्रुती हेवाळेकर यांनी मेहनत घेतली.