मुंबई : मुंबईमध्ये या दोन दसरा मेळाव्याशिवाय देवीचं विसर्जनही होणार आहे, त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मध्ये पोलिसांनी चेन सिस्टीममध्ये बंदोबस्त केला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राहावा, यासाठी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सऍप ग्रुपही बनवण्यात आला आहे.
प्रत्येक डीसीपीच्या अखत्यारीत 4 एसीपी असतील, या एसीपींना 10-12 पोलिसांची टीम रिपोर्ट करेल. मुंबईत ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सुरक्षा स्टेशनही बनवण्यात आली आहेत.
दोन्ही दसरा मेळावे आणि नवरात्र विसर्जनासाठी मुंबईत 3,200 ऑफिसर, 15,200 पोलीस, 1,500 एसआरपीएफचे जवान, 1,000 होमगार्ड, 20 क्युआरटी टीम आणि 15 बीडीडीएस टीमचा समावेश आहे. या दोन्ही दसरा मेळाव्याआधी मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेची पाहणी केली.