108 यज्ञ कुंडांचा महाशिवयागाने गोवा झाले भक्तिमय

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, सदानंदशेठ तानावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: March 13, 2023 09:55 AM
views 186  views

पणजी : समाजाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी योग्य गुरूंची गरज असते, आणि हाच भक्तिमार्ग गोव्यात रुजविण्यासाठी सद्गुरू गावडे काका महाराज यांनी घेतलेला पुढाकार आम्हांसाठी मोठं पाठबळ देणारा आहे, त्यामुळे या अध्यात्मातून समजाला समृध्द बनविण्याच्या कार्यात लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असे उदगार गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी काढले. आपल्या आयुष्यात एकाच वेळी 108 यज्ञ कुंडाचा महाशिवयाग प्रत्यक्ष पाहण्याचा आणि प्रत्यक्ष यात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभले असून हा  लोक कल्याणकारी महायाग समस्त गोमंतकीय जनतेच्या आणि देशासाठी कल्याणकारी ठरोत अशा सदिच्छा मंत्री श्री. खवंटे यांनी दिल्या.


१०८ यज्ञ कुंड महाशिवयाग यज्ञाला आवर्जून उपस्थीती लावलेल्या मंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार करताना सद्गुरू गावडे काका महाराज


श्री श्री 108 महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज संस्थापक श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास, माड्याचीवाडी श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास, बेती, पणजी अखिल भारतीय महात्यागी साधू समाज आखाडा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा बेती येथे रविवारी 108 यज्ञ कुंडांचा महाशिवयाग मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात पर्यटन मंत्री रोहन खवंटे बोलत होते.



गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांना शाल पांघरून सन्मानित करताना सद्गुरू गावडे काका महाराज. 


यावेळी त्यांचे समवेत कार्यक्रमांचे अध्यक्ष केंद्रीय राज्य पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सरपंच स्वप्नील चोडणकर, झेड पी मेंबर कविता नाईक, संदीप बांदोडकर, उपसरपंच दिपाली वर्णेकर यांसह श्वेता कोरगावकर, राजू राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. 


गोव्यात मंदिरासाठी विनामूल्य जमीन देणाऱ्या भक्तांना आशिर्वाद देतांना गावडेकाका महाराज


तत्पूर्वी श्री श्री 108 महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज आणि केरळ मधील पुरोहित श्रिजीत लंबोदर यांच्या पौरोहित्याखाली गोव्याच्या निसर्गरम्य देवभूमीत पर्यावरण, अध्यात्म, विज्ञान, संगीत, संस्कृती, श्रद्धा, भक्ती आणि कर्म यांचा सुरेख संगम म्हणजे 108 यज्ञ कुंडांचा महाशिवयाग संपन्न झाला.


गोवा: १०८ यज्ञ कुंड महाशिवयाग यज्ञाला उपस्थीती लावलेल्या गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ  तानावडे यांचे स्वागत करताना सद्गुरू गावडे काका महाराज, सोबत मंत्री श्रीपाद नाईक, राजू राऊळ, श्वेता कोरगावकर


गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महायागाच्या पूर्वसंध्येलाच पवित्र श्री महाशिवयाग स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन श्रींचे आशीर्वाद घेतले. तर रविवारी गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या 108 यज्ञ कुंडांच्या महाशिवयागाला गोवा व महाराष्ट्र  स्वामीभक्त सकाळ पासून यज्ञ मंडपात उपस्थीत होते . सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत न भूतो ना भविष्यती  असा धार्मिक विधिवत महाशिवयाग संपन्न झाला. समजातील दुःख, दारिद्रय, अरिष्ट दूर करण्यासाठी व आपली पुढची वाटचाल समृद्धीकडे नेण्यासाठी समस्त गोमंतकीय व महाराष्ट्रातील भक्तमंडळी मोठ्या संख्येने सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गोव्यात हजेरी लावली होती. हा महाशिवयाग संपन्न झाल्यानंतर कार्यक्रम पूर्वी मंत्री श्रीपाद नाईक, रोहन खंवटे व उपस्थित मान्यवर मंडळीनी प्रत्यक्ष महाशिवयाग ठिकाणी नमन करत व स्वामी समर्थ यांच्या पादुकांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

 त्यानंतर गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या या 108 यज्ञ कुंडांच्या महायाग निमित्तानं आयोजित भव्य कार्यक्रमात मंत्री महोदय सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या सह उपस्थित झाले. यावेळी उपस्थित 5 हजार हून अधिक भक्तांना मान्यवरांनी संबोधित केलं. यावेळी सद्गुरू गावडे काका महाराज यांनी भक्त गणना मार्गदर्शन केलं. भक्ती मार्ग हाच खरा मुक्ती मार्ग आहे. त्यामूळे देव देवसकीच्या मागे न लागता अध्यात्म जाणा आणि स्वामी सेवा करा असा संदेश त्यांनी भक्त गणाना दिला. येत्या वर्षभरात गोव्यातील संकल्पित मंदिर सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत. गोव्यात लोक कल्याणकारी 108 यज्ञ कुंडाचा महाशिवयाग होणे ही श्रींची इच्छा असल्याचं आवर्जून त्यांनी सांगितले.

 या मान्यवरांचे स्वागत श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त निवास सेवा न्यास (रजिस्टर) राकेश केसरकर यांनी केलं. तर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रीती कुशे, विनायक परब, बंड्या सावंत, राजू राऊळ, सुरेश नारुरकर, विनायक परब, पुरोहित श्रीजित लंबोदर आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 


प्रत्यक्ष महायाग ठिकाणी आशिर्वाद सद्गुरू गावडेकाका महाराज व पुरोहित यांचेकडून घेताना मंत्री महोदय


अध्यात्मात मोठी शक्ती : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

अध्यात्म हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे, त्यामुळे आपण ज्या भक्ती भावाने स्वामी मार्ग पत्करू, तोच भाव आपल्याला भविष्यात तारणार आहे. म्हणुन समाजासाठी जे काय करता येईल ते आपण केल पाहिजे, असा संदेश केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यानी दिला.