LIVE UPDATES

लोकप्रतिनिधी, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

जि.प.सदस्य देवदत्त कदम यांच्याकडून आरे येथील परिसरात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 18:14 PM
views 14  views

देवगड : देवगड तालुक्यातील आरे येथे भात,नाचणी व भुईमूग पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीची योग्य प्रकारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल,अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी कडून यावेळी देण्यात आली.

शासन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल,असेही यावेळी सांगण्यात आले.पाहणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या वेळी ग्रामपंचायत अधिकारी मलगुंडे, सहाय्यक कृषी अधिकारी इडोळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत पिकांच्या नुकसानीची वस्तुस्थिती समजून घेण्यात आली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत व मार्गदर्शन मिळावे,यासाठी प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.