LIVE UPDATES

झाड कोसळल्याने फोंडा-वैभववाडी मार्ग ठप्प

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 18:45 PM
views 41  views

वैभववाडी : वैभववाडी-फोंडा मार्गावरील लोरे नं. २ येथे वैशाली रावराणे यांच्या घरासमोर सोमवारी भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. झाड रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

झाड कोसळल्याची माहिती मिळताच माजी सरपंच महेंद्र रावराणे, रितेश सुतार, चेअरमन छोटू रावराणे, मंदार रावराणे, संतोष गुरव, दीपक रावराणे आणि आदित्य रावराणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.