LIVE UPDATES

ओरोस पिट ढवळ नदीत युवक गेला वाहून

नारळी पौर्णिमेच्या संध्येला दुर्दैवी घटना
Edited by: कोकणसाद Live न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 08:34 AM
views 368  views
Kokansad Live # sindhudurg news #breaking news

ओरोस पिट ढवळ नदीत नारळी पौर्णिमेच्या संध्येला युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे.

ओरोस:

नारळी पौर्णिमेच्या आनंदाच्या सणाच्या दिवशी ओरोस परिसरातील पिट ढवळ नदीवरून एक युवक नदीच्या पात्रात पडून वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारळी पौर्णिमेच्या संध्येच्या सुमारास ही घटना घडली. युवक नदीच्या पात्राजवळ असताना पाण्यात पडल्याने तीव्र प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रात्रीच्या सुमारास एनडीआरएफ (NDRF) ची टीमही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, रात्रीचा गडद अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे रात्रीच्या वेळी शोधकार्य राबवणे अशक्य झाले. त्यामुळे प्रशासनाकडून रात्रीचा बचावथांबा घेतल्यानंतर, आज सकाळी उजाडताच युद्धपातळीवर शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. NDRF टीम दाखल होताच शोध कार्य सुरू होणार आहे.

सणाच्या दिवशीच झालेल्या या दुर्घटनेमुळे ओरोस आणि लगतच्या भागात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून, संबंधित युवकाचा शोध लवकर लागावा अशी प्रतीक्षा ग्रामस्थ व नातेवाईक करत आहेत.