LIVE UPDATES

सातासमुद्रापार पोहोचली लाडक्या बहीणींची राखी

सिंधुदुर्गातून थेट विदेशात ; भारतीय डाक विभागाची सेवा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 27, 2026 20:51 PM
views 64  views

सिंधुदुर्ग : सातासमुद्रापार असलेल्या भावाला लाडक्या बहीणीने रक्षाबंधन निमित्ताने राखी पाठवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थेट विदेशात ह्या राख्या पोहचल्या असून भारतीय डाक विभागाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. 

अत्यंत कमी दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय डाक विभागातून तसेच ग्रामीण पोस्ट ऑफिसमधून परदेशात सुरक्षित स्पीड पोस्ट तसेच पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींची राखी थेट परदेशात पोहचू शकली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंबे ब्रान्च ऑफिसहून थेट न्युझीलंड, मालवण पोस्ट खात्याच्या उपविभागीय कार्यालयातून जर्मनी, यूके, मुळदे ब्रान्च ऑफिसहून थेट ऑस्ट्रेलिया तर मळगाव ब्रान्च ऑफिसमधून जर्मनीला राखीसह भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत. सातासमुद्रापार असलेल्या भावासह नातेवाईकांना भेटवस्तू पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय डाक विभागाचे आभार मानण्यात आलेत.