
सावंतवाडी : नेमळे गावातील गावकर कुंभारवाडी मधील धनगरवाडी या वाडीवर ये- जा करण्यासाठी साधी पायवाट ही नसल्याने या वाडीवरील शाळकरी विद्यार्थी,महिला, तसेच वृद्धांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आजारी रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायचे असेल तर रुग्णाच्या घराकडून पाचशे मीटर अंतरावर ग्रामीण रस्त्यापर्यंत रुग्णाला उचलून आणावे लागते. त्यानंतर रिक्षातून रुग्णालयात घेऊन जावे लागते अशी परिस्थिती नेमळे धनगरवाडी लोकवस्ती मधील असल्याचे स्थानिकांनी म्हटलं आहे. निवडणुका आल्या की केवळ आश्वासने दिली जातात. तीस वर्षे धनगरवाडीतील लोकांची वारंवार फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी संतप्त स्थानिकांनी केला.










