LIVE UPDATES

कुडाळात उबाठा सेनेच्या वतीने नारळी पौर्णिमा रॅली संपन्न

माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 27, 2026 21:00 PM
views 136  views

कुडाळ : तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेच्या औचित्याने उबाठा सेनेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. कुडाळ शाखेकडून काढण्यात आलेल्या या रॅलीस शिवसैनिकांचा आणि रिक्षाचालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.

रॅलीदरम्यान संपूर्ण कुडाळ शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या रॅलीसाठी माजी आमदार वैभव नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. ज्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांचा जोश अधिक वाढला. मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते आणि रांगेत चाललेल्या रिक्षा हे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.

ही रॅली कुडाळ शहरातील विविध मार्गावरून मार्गस्थ होत भंगसाळ नदीवर पोहोचली, जिथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी अमरसेन सावंत यांच्या हस्ते नदीत नारळ अर्पण करून विधीवत पूजा करण्यात आली व रॅलीची सांगता झाली. यावेळी रॅलीत अमित सामंत, अमरसेन सावंत, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, गुरु गडकर, अतुल बंगे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.