LIVE UPDATES

मोटारसायकल चोरीतील दुसरा संशयित गोव्यातून ताब्यात

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 11:12 AM
views 48  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला पणजी, गोवा येथून शिताफीने ताब्यात घेतले.

वेंगुर्ला पोलीस स्थानकात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पणजी, गोवा येथे सापळा रचून धीरज दिलीप गुप्ता (वय 20, रा. गणेशनगर, कोलवाळे, गोवा) याला ताब्यात घेतले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, ASI सुरेश राठोड, ASI डॉमीनिक डिसोझा, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्साल्विस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, महेश्वर समजिस्कर व WPC धनश्री परब (सायबर) यांचा सहभाग होता.