LIVE UPDATES

‘ओंकार’ हत्तीला सुरक्षिततेसाठी ‘वनतारा’ प्रकल्पात पाठवा

मंगेश तळवणेकरांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 20:24 PM
views 31  views

सावंतवाडी : 'ओंकार' हत्ती आमचे दैवत असून सध्या त्याचे होणारे हाल पाहून मन हेलावते. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्याने ओंकार हत्तीला सुरक्षिततेसाठी 'वनतारा' प्रकल्पात पाठवावं, अशी मागणी मंगेश तळवणेकर यांनी केलीय.

माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर म्हणाले, ओंकार हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे ३० हून अधिकारी, कर्मचारी असून हा खर्च मोठा आहे. तिलारी येथे प्रकल्प होणार असं समजते. पण, तो होईपर्यंत लोकांची बागायती, शेती वाल्यांना दिलासा मिळेल.

दिवसरात्र सोबत असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना सुद्धा इतर कामासाठी मुक्त वेळ मिळेल. ओंकार शांत आहे याचा अर्थ तो कायम शांत राहील असं नाही. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा व ओंकार हत्तीला 'वनतारा' येथे पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.