
दापोली : अगदी नर्सरी पासून ते सातवीपर्यंत अनेक शैक्षणिक सुविधा, अद्ययावत डिजिटल, ऑनलाइन स्क्रीन संगणक आदी आधुनिक पद्धतीचे ऑनलाइन शिक्षण सुविधा हजारो किंवा लाखो रुपयांची फी मोजल्यावर विद्यार्थ्यांना मिळतात यामध्ये काही नवल नाही पण राज्यातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिक्षण मिळाल्यास तो नक्कीच कौतुकाचा विषय आहे.
प्राथमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढवा, शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम काही प्राथमिक शाळांना पुरवण्यात आले आहेत. यामध्ये कोकणातील काही शाळांचा समावेश असून ग्रामीण भागात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील हर्णै उर्दू व गिम्हवणे येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळेचाही समावेश आहे. पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत डिजीटल क्लासरूम असलेले 'आयडियल सेंटर' विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा व नाविन्यपूर्ण विषय ठरला आहे.
राज्य शासनाकडून यासाठी काही प्राथमिक शाळांमध्ये ही अद्ययावत सुविधा डिजिटल क्लासरूम एस्टॅब्लिश करण्यात आले आहेत. कोकणातील ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे अभ्यासाची आवड व गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक स्वरूपाच्या क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यास तासिका शैक्षणिक वेळेत ॲक्शन मोडवर सुरू झाल्या आहेत. पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी टाईम टेबल तयार करून वर्गाबाहेर लावण्यात आल आहे. याप्रमाणे पहिली ते सातवी या सगळ्याच विद्यार्थ्यांना या क्लासरूमचा उपयोग होतो. शासनाने यासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचा निधी खर्च करून काही ग्रामीण भागातील शाळांसाठी अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम उभे करून दिले आहेत.
अद्ययावत डिजिटल क्लासरूम मध्ये इंटरनेट वायफाय सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्राथमिक शाळेतही अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळू लागल आहे. हा डिजिटल क्लासरूमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही प्रेमात पडले असून या क्लासरूम मध्ये बसून अध्ययन करण्यासाठी चिमुकले विद्यार्थी विद्यार्थिनी ही मोठ्या आवडीने बसून अध्ययन करू लागली आहेत.
मराठी विज्ञान गणित इतिहास भूगोल शैक्षणिक विषय या क्लासरूम मधून सोप्या ॲनिमेशनचा उपयोग करून शिकवले जातात. त्यामुळे शासनाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना, बौद्धिक कौशल्याला मोठ प्रोत्साहन मिळणार आहे.
गिम्हवणे आदर्श केंद्र शाळेत 24 संगणक, अद्ययावत इंटर ऍक्टिव्ह बोर्ड, खास लुक असलेले विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चेअर व बेंचस असा छान लुक या क्लासरूमचा आहे. विद्यार्थी व पालकांच्या व ग्रामस्थांच्याही कौतुकाचा विषय ठरला आहे.
ग्रामपंचायत प्रशासक ,ग्रामसेवक,सरपंच माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावचे अध्यक्ष यांच्याकडूनही या डिजिटल क्लासरूमचे भेट देऊन कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये हा विषय कुतूहलाचा ठरला आहे. या क्लासरूम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हेडफोन तसेच प्रश्न विचारण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, प्राथमिक विभागाच्या जिल्हा शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, येथील स्थानिक आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम, दापोली पंचायत समिती सभापती उन्मेश राजे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख सुनील कारखिले, मुख्याध्यापिका सुरेखा कारखिले व गावातील सरपंच उपसरपंच तंटामध्ये अध्यक्ष अधिक ग्रामस्थांच्या सहकार्याने ही क्लासरूम एज्युकेशनल दृष्ट्या शैक्षणिक वेळेत ॲक्शन मोडवर आहे. या डिजिटल अत्याधुनिक डिजिटल क्लासरूमचे औपचारिक उद्घाटन लवकरच मंत्री महोदयांच्या केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
बहुतांश प्राथमिक शाळा या कौलारूच आहेत मात्र या डिजिटल क्लासरूमला पावसापासून बाहेरच्या बदलत्या वातावरणापासून संरक्षण मिळावे यासाठी प्लास्टिकच्या आच्छादन करून हे आयडियल सेंटर सज्ज करण्यात आला आहे. मात्र या डीजीटल क्लासरूममध्ये फॅन ची सुविधा असली तरी एअर कंडिशन म्हणजेच ए.सी.ची कमतरता आहे. यासाठी मुलांच्या शैक्षणिक सुविधांना मदत करण्याचे सामाजिक शैक्षणिक बांधिलकीतून ए.सी.साठी डोनर मिळाल्यास या क्लासरू साठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेली ए.सी.ची गरज उपलब्धता झाल्यास या डिजिटल क्लासरूम आयडियल सेंटर परिपूर्ण होणार आहेत.










