LIVE UPDATES

कुणकेश्वर येथे जागतिक शौचालय दिन साजरा

सार्वजनिक शौचालयाचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; ‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ अभियानाला प्रारंभ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 07:46 PM
views 43  views

देवगड : जागतिक शौचालय दिन २०२६ निमित्त पंचायत समिती देवगड आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुणकेश्वर कातवणेश्वर येथील सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती गणेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) दीपक तेंडुलकर, कुणकेश्वर प्रशासक तथा विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) तुषार हळदणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर जोईल, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संतोष लब्दे, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, स्वीय सहाय्यक दीपक मयेकर, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, समूह समन्वयक विनायक धुरी, मंगेश मेस्त्री आणि अमित सावंत आदी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक आणि संस्थात्मक शौचालयांची कार्यक्षमता, सुरक्षितता व सुलभता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः महिला, शालेय विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन शौचालय सुविधा अधिक सुरक्षित व सोयीस्कर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

संस्थात्मक शौचालयांच्या देखभाल व सुधारणांसाठी संबंधित प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी केंद्र आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच गावांमधील शौचालयांच्या प्रकारांचे मूल्यांकन करून एक खड्डा शौचालये आणि सेप्टिक टँक शौचालयांचे आवश्यकतेनुसार अद्ययावतीकरण केले जाणार आहे.

मैला गाळ व्यवस्थापन नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यकतेनुसार यांत्रिक पद्धतीने गाळ उपसण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासोबतच सुरक्षित स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी शौचालयांचा नियमित वापर करावा, गावाचा हागणदारीमुक्त (ODF) दर्जा कायम राखावा आणि साबणाने हात धुण्यासह स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानाची सांगता १० डिसेंबर २०२६ रोजी मानवाधिकार दिनानिमित्त होणार आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन विविध स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहन सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके आणि गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी केले.


ताजी बातमी

View all

Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg
Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026
Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
आकारीपड जमीन प्रश्नावर उद्या गोठोस तिठा येथे महत्त्वपूर्ण मेळावा
November 19, 2026