LIVE UPDATES

शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 17:27 PM
views 85  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासन माझी वसुंधरा अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत काझी शहाबुद्दीन हॉल येथे ही कार्यशाळा संपन्न झाली.

एकूण 150 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. मदर क्वीन्स स्कूल, मिलाग्रीस स्कूल, सेंट्रर इंग्लिश स्कूलही सहभागी होते. कार्यशाळेमध्ये बांदेकर फाईन आर्ट कॉलेज विद्यार्थी वेदांत चिंदरकर यांनी शाडू मातीपासून सुबक गणेश मूर्ती साकारली व त्याचे प्रात्यक्षिक दाखलले. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, सभापती मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, अजय गोंदावळे, सुनिता पेडणेकर, नीलम नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंतवाडी नगरपरिषदेचे उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांनी केले.