LIVE UPDATES

हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगारांचा मोर्चा गर्मी वाढवणार

‘मुंबईतच हक्काचे घर’ या मागणीसाठी नागपूर गाजणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 03:48 PM
views 47  views

कुडाळ : हक्काच्या घरांसाठी गेल्या ४० ते ४२ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या गिरणी कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि प्रामुख्याने ‘मुंबईतच हक्काचे घर’ मिळावे या मागणीवर ठाम राहत, राज्यातील सर्व गिरणी कामगार एकत्र येऊन नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहेत. या आक्रमक आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. याबाबतची बैठक ही ओरोस रवळनाथ मंदिर येथील सभा मंडपात आयोजित करण्यात आली होती.

गेल्या चार दशकांपासून शासनाकडून गिरणी कामगारांना केवळ आश्वासनेच मिळाली, मात्र अद्याप ठोस अंमलबजावणी झालेली नाही. राज्यात नवीन सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आपले प्रश्न मार्गी लागतील, अशी कामगारांना अपेक्षा होती. परंतु, या अपेक्षांचा भंग झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्या इतिहासात हा पहिलाच प्रसंग आहे, जेव्हा कामगार थेट नागपूर अधिवेशनावर मोर्चा नेणार आहेत. यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांत व गावोगावी बैठका घेऊन कामगारांची एकजूट बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे.

गिरणी कामगारांच्या घरांबाबत यापूर्वी घेण्यात आलेली संमतीपत्रे चुकीच्या पद्धतीने भरून घेण्यात आली आहेत, याबाबत शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप कामगार संघटनांकडून केला जात आहे.

“महाराष्ट्र शासन गिरणी कामगारांना मुंबईत घर देणार की नाही, याचे स्पष्ट उत्तर हवे आहे. सरकारचा होकार असेल, तर त्यासाठी तातडीने विशेष धोरण किंवा आराखडा जाहीर करावा; अन्यथा सरकारने नकार देऊन येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे,” असा थेट इशारा कामगारांनी दिला आहे.

जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतल्याने या आंदोलनात गिरणी कामगार व त्यांचे वारस मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आता राज्य सरकार यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या ओरोस येथे झालेल्या बैठकीला संयुक्त मराठी मुंबई चळवळ संघ मुंबई रमाकांत बने, कार्याध्यक्ष शिवराम जाधव,  उपाध्यक्ष रविन्द्र गवळी, सचिव गौतम कांबळी, सदस्य सिद्धानाथ चव्हाण, सदस्य मंगेश नेवगे, जिल्हा समन्वयक कृष्णा भोगवेकर जिल्हा प्रतिनिधी व गिरणी कामगार उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

RPD College students rescue a man who fell into Moti Lake in Sawantwadi.
Sawantwadi Moti Lake : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक
November 25, 2026
संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
November 25, 2026
Food Express recruitment for delivery tempo drivers at Karaswada, Mapusa, Goa.
कायमस्वरूपी नोकरी पाहिजे ?
November 25, 2026
Rajaram Khorjuvekar stages an indefinite hunger strike outside Kudal Tehsil Office over the Bhajan Dabalbari controversy.
डबलबारीतील अश्लील भाषेच्या वापरावर सर्वच दोषींवर कारवाई करा
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

RPD College students rescue a man who fell into Moti Lake in Sawantwadi.
Sawantwadi Moti Lake : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक
November 25, 2026
संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
November 25, 2026
Rajaram Khorjuvekar stages an indefinite hunger strike outside Kudal Tehsil Office over the Bhajan Dabalbari controversy.
डबलबारीतील अश्लील भाषेच्या वापरावर सर्वच दोषींवर कारवाई करा
November 25, 2026
Lakhs of devotees gather at Shri Devi Mauli Temple in Sonurli for the annual Mauli Jatra.
Sonurli Mauli Jatra 2026 : सोनुर्लीच्या श्री देवी माऊली जत्रोत्सवाला लाखो भाविकांची मांदियाळी
November 25, 2026