LIVE UPDATES

जलसफर व्यावसायिकांनी घेतली आ. निलेश राणेंची भेट

विविध प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 16:33 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update#

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा लाईट हाऊस जलसफर संघर्ष समिती पदाधिकारी तसेच शेकडो जलसफर व्यावसायिक यांनी शुक्रवारी आमदार निलेश राणे यांची मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. तसेच काही महत्वाचे प्रश्न आमदार निलेश राणे यांनी तात्काळ सोडवत लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांना दिलासा दिला आहे. 

आमदार निलेश राणे नेहमीच पर्यटन व्यवसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आताही काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्यावरही सकारात्मक निर्णय होऊन शेकडो व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. असे सांगत सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती उपस्थित बहुसंख्य सदस्यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

पर्यटकांची सुरक्षा, सुरक्षित पर्यटन याला नेहमीच येथील पर्यटन व्यवसायिक प्राधान्य देतात. त्याच पद्धतीने पर्यटकांची सुरक्षा व नियमांचे पालन यापुढेही केले जाईल. असे पर्यटन व्यवसायिकानी यावेळी स्पष्ट केले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्हाला मोठा दिलासा मिळाला. यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले. असे पर्यटन व्यवसायिकानी सांगितले. 

यावेळी बाबली चोपडेकर, बाबा मोंडकर, बाबा परब, बबन शिंदे, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती अध्यक्ष मनोज खोबरेकर, उपाध्यक्ष प्रतिक कुबल, सचिव नागेश सारंग, खजिनदार सतिश टिकम, विशेष निमंत्रित सरपंच तारकर्ली, देवबाग, भोगवे, किल्ले निवती, श्रीरामवाडी - कोचरा, निवती, यांसह समिती सदस्य म्हणून देवबाग बाबली चोपडेकर, सहदेव साळगावकर, राम चोपडेकर, पंकज धुरी, मोरेश्वर धुरी, रमेश कद्रेकर, दिनेश गांवकर, अक्षय वालावलकर. तारकर्ली संजय केळुसकर, कांचन खराडे, मोहन केळुसकर, गोरक्ष पराडकर, गोविंद(ताता) केळुसकर, हर्षवर्धन रोगे, सुरज भोसले. भोगवे विनायक केळुसकर, सिद्धेश वायंगणकर, राजन मालणकर. 

किल्ले निवती हर्षद सावंत, संकेत गावडे. श्रीमरामवाडी (कोचरा) आबा कोचरेकर, अतुल सारंग, हर्षल निवतकर. निवती मनिष मेथर, कमलेश मेथर. वेंगुर्ला किरण तांडेल, भगवान कुबल आदी प्रतिनिधी सदस्य यांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या उपस्थित प्रतिनिधी तसेच शेकडो पर्यटन व्यावसायिक यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली.

सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीने दिलेला निवेदनात म्हटले आहे. हा व्यवसाय अनेक वर्षांपासून शासनाचे सर्व नियम पाळून, लाईफ जॅकेट व आवश्यक सुरक्षा साधनांसह सुरू आहे. प्रशासनाने येथील जलसफरवर काही नियमांचा ब्रेक लावल्यामुळे स्थानिक रोजगारावर तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होणार असून व्यावसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

हा व्यवसाय सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन आहे. असे असताना निवती लाईट हाऊस व म्हातारीची चुळ परिसरातील जलसफरीवर प्रशासनाने काही नियमानुसार ब्रेक लावला आहे. प्रशासनाचा आक्षेप आहे की, या बोटी ‘इनलँड व्हेसल्स (IV) ॲक्ट’ अंतर्गत नोंदणीकृत असल्याने त्यांना पाच नॉटिकल मैलांच्या पुढे जाता येत नाही. मात्र, निवती लाईट हाऊसची जलसफर ही खोल समुद्रातील मासेमारी साठीचा प्रवास नसून ४५ ते ६० मिनिटांचा पर्यटन फेरा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.

 निवती लाईट हाऊस हा खोल समुद्रातील मासेमारी प्रवास नसून ४५ ते ६० मिनिटांचा पर्यटन फेरा आहे. IV Act मधील तरतुदीनुसार या परिसराला ‘Special Tourism Zone’ म्हणून अधिसूचित करून पाच नॉटिकल मैलांच्या अटीतून शिथिलता द्यावी. कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत जलसफारी पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी. नोंदणी व परवानगी प्रक्रिया सुलभ करावी : MMB व DOT यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोंदणी व परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याबाबत अवगत करावे.

स्थानिक जल-पर्यटन व्यावसायिकांच्या या प्रश्नाकडे आपण लक्ष घालून आम्हाला तुम्ही 100 टक्के दिलासा द्याला हा विश्वास आहे. तसेच पालकमंत्री तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यामार्फत बंदर विभागाला योग्य निर्देश द्यावेत, अशी ही विनंती सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीने केली आहे. याबाबत स्थानिक बंदर अधिकारी यांच्याशी ही आमदार निलेश राणे यांनी चर्चा केली. एकूणच या संपूर्ण विषयात जलसफर व्यावसायिकांच्या समस्या लक्षात घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. नियमांचे पालन व पर्यटकांची सुरक्षा हे मुद्दे ही केंद्रस्थानी ठेवण्यात आले. चर्चेअंती काही प्रश्न तात्काळ सोडवण्यात आले आहेत. त्यामुळे जलसफर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

गणेश चतुर्थी उत्सवानंतर मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती प्रतिनिधी यांनाही यां बैठकीत निमंत्रित केले जाईल. विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून जलसफर व्यावसायिकांना दिलासा मिळवून दिला जाईल. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी पर्यटन व्यवसायिकांच्या सोबत असल्याचे सांगितले.