LIVE UPDATES

सैतावडे पाडागर येथील बारमाही जलस्रोताच्या पाण्याचा अपव्यय

योग्य नियोजन करण्याची ग्रामस्थांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 30, 2026 12:11 PM
views 112  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : तालुक्यातील सैतावडे पाडागर येथे बारमाही वाहणारा नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध असून,या स्रोतामधून वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. मात्र, या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी पाणी अडविण्यासाठी उभारण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे मोठे पिलर फुटून वाहून गेले आहेत.त्यामुळे पाणी अडविण्याच्या व्यवस्थेचे नुकसान झाले असून, या ढासळलेल्या काँक्रीटच्या पिलरची पुन्हा उभारणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

एकीकडे उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, तर दुसरीकडे सैतावडे पाडागर येथील बारमाही वाहणारे मुबलक पाणी योग्य नियोजनाअभावी वाहून जात आहे.या जलस्रोताचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करून पाणी अडविणे,साठविणे आणि त्याचा शेतीसाठी उपयोग करणे शक्य आहे.यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होऊ शकते.

त्यामुळे संबंधित शासकीय विभागाने या जलस्रोताची पाहणी करून पाणी अडविण्याच्या व्यवस्थेची दुरुस्ती करावी.तसेच ढासळलेल्या काँक्रीटच्या पिलरची पुनर्बांधणी करून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सैतावडे पाडागर येथील स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.


ताजी बातमी

View all

शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Dodamarg News : 'माझे गाव नशामुक्त गाव' अभियानांतर्गत जनजागृतीपर रॅली
October 30, 2026
Three drums filled with cash found buried underground at a house in Nawabganj, Uttar Pradesh.
घराखाली पुरलेले ३ ड्रम भरून नोटांचे घबाड! ६० कोटींच्या रकमेचे गूढ कायम, पुण्यातील कनेक्शनचीही चर्चा
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg Bank :ग्रामीण अर्थव्यवस्थेचा 'कणा' बळकट करणारे 'दळवी' पर्व
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Dodamarg News : 'माझे गाव नशामुक्त गाव' अभियानांतर्गत जनजागृतीपर रॅली
October 30, 2026
सिंधुदुर्गात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती रॅली संपन्न
October 30, 2026
Anam Prem Family sends 25000 Diwali faral boxes to Indian soldiers deployed at the border.
सीमेवरील जवानांची दिवाळी गोड करणार सावंतवाडीतील 'अनाम प्रेम' परिवार
October 30, 2026