LIVE UPDATES

विद्यार्थ्यांप्रती सामाजिक बांधिलकी

विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 11, 2026 12:29 PM
views 24  views

  • दोडामार्ग नं. 1 केंद्रशाळेत वह्या-दप्तरांचे वाटप

दोडामार्ग : भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून जि. प. केंद्रशाळा दोडामार्ग नं. १ येथील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी विशाल परब यांच्या सौभाग्यवती वेदिका परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू," असे सांगितले.

कार्यक्रमास माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, नगरसेविका संध्या प्रसादी, मुख्याध्यापक एकता नाईक,पालक संघ अध्यक्ष सुमित दळवी, प्रमोद दळवी, पत्रकार शिरीष नाईक, महेश गवस,संजू उसपकर, सुहास दळवी, नाना देसाई, शिक्षक वर्षा काळे, संदीप सावंत, विशाल तायडे,पालक अंजली बुगडे, दिक्षीता देसाई, अश्विनी सावंत, अंजली गायकवाड, श्री धरणे आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याची बाब विशाल परब यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची तत्काळ दखल घेत त्यांनी शाळेसाठी वॉटर प्युरिफायर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.