LIVE UPDATES

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त

स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 11, 2026 12:24 PM
views 83  views

  • आमदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा 

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. डॉ. प्रशांत बागडे, बालरोग तज्ञ डॉ. वैशाली चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार निलेश राणे यांनी नुकतीच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून मतदारसंघातील आरोग्यस्थितीचा अहवाल सादर केला होता. जनतेला आरोग्य सेवेच्या दृष्टीने तसेच १० लाखांपेक्षा जास्त पर्यटक ज्या मालवण शहराला भेट देतात त्या मालवण शहरातील ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती मांडत या रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालय म्हणून दर्जा देत सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यावर तत्काळ उपाययोजना करत डॉ. वैशाली चव्हाण बालरोगतज्ञ व डॉ. प्रशांत बागडे स्त्रीरोग तज्ञ यांची मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती केली आहे.

जनतेला अधिकाधिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील आहेत. त्यांच्या अनुषंगाने मालवण ग्रामीण रुग्णालय येथील रिक्त पदावर डॉक्टर नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर, पालकमंत्री नितेश राणे तसेच आमचे आमचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत या सर्वांचे शिवसेना मालवण तालुका प्रमुख मंदार लुडबे यांनी  जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.