LIVE UPDATES

मळेवाड हेदुलवाडीत रिक्षा-बोलेरो पिकअपची जोरदार धडक

गंभीर जखमी रिक्षाचालक सावंतवाडी रुग्णालयात दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 17:54 PM
views 52  views

सावंतवाडी : मळेवाड हेदुलवाडी बँक ऑफ इंडिया समोर आज सव्वा दोनच्या सुमारास रिक्षा व बोलेरो पिकअपमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात रिक्षा चालक विनायक रंगनाथ बाळे (वय ४०) आजगाव भोमवाडा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ सावंतवाडी रुग्णालयात नेण्यात आले असून बोलेरो पिकअप मधील ड्रायव्हर व एक प्रवासी किरकोळ जखमी झालेत. त्यांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेस्टेशनवरून मळेवाडच्या दिशेने विनायक बाळे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन आजगाव भोमवाडी येथे जात असताना मळेवाड हेदुलवाडी बँक ऑफ इंडिया शाखेच्या समोर आले असताना त्याचवेळी मळेवाड वरून सावंतवाडीच्या दिशेने बोलेरो पिकअप आली असता समोरासमोर धडक बसून रिक्षा पलटी झाली. यावेळी रिक्षा चालक रस्त्यावर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत बाळे यांना रुग्णवाहिकेतून सावंतवाडी रुग्णालय दाखल केले. यात रिक्षेचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आरोंदा पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.