
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शनिवारी पेडणे येथे गोवा राखण यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीही प्रमुख उपस्थिती होती. पेडणे येथील ग्रामदैवत भगवतीचा आशीर्वाद घेऊन तसेच पत्रादेवी येथील गोवा स्वातंत्र संग्राममधील स्वातंत्र सैनिकांना अभिवादन करून गोवा राखण यात्रेच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी उपस्थिताना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी मोनिका जगताप, तुकाराम कदम उज्वला साळवे, महेश भणगे, बाबासाहेब गायकवाड, अँड समिर वंजारी, अँड जितेंद्र गावकर, मिलिंद माटे, बालाजी सावळे, सुनील पारकर, संतोष पाटील, फजील शेख, प्रतिक यादव, प्रल्हाद गायकवाड, विजय पाटील, विनोद पाटील, कुणाला शेळके, संदीप तिवारी आदी उपस्थित होते.
गोव्याची जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक अस्मितेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने 'गोवा राखण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर रोजी पणजी येथून शुभारंभ झालेली ही यात्रा १८ ऑक्टोबर पर्यंत गोव्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमधून सुमारे ३५५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. गोव्यात जमिनींचे होणारे अनधिकृत रूपांतरण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिक तरुणांच्या रोजगारावर होणारे गदा आणणारे निर्णय याविरोधात जनजागृती करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.










