LIVE UPDATES

तळवडेच्या कृष्णा सावंतची तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 17:58 PM
views 35  views

सावंतवाडी : इंग्लिश मिडीयम स्कूल, तळवडेचा इयत्ता १० वी चा विद्यार्थी कु. कृष्णा सावंत याने शालेय तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.

बांदा येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत (५५ ते ५९ किलो वजनी गट) त्याने प्रथम क्रमांक पटकावला. या यशानंतर ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेत त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तुझ्या यशाने आमच्या शाळेचा अभिमान वाढला आहे, अशी भावना शाळेच्या सीईओ मैथिली नाईक, यांनी व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता मयेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.