
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना भक्कम असून आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणी सुरू आहे. आमदार हा संपूर्ण जनतेचा असतो त्यामुळे प्रत्येकाचे काम करावे लागते. अनेक कोटींची कामे या मतदार संघात दीपकभाईंनी आणली. म्हणून चार वेळा जनतेने दिपकभाईना प्रेम दिल आहे. प्रत्येक ग्रामपंचायतिला निधी मिळाला पाहिजे ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी आमदार केसरकर कार्यरत आहेत. यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी लोकांच्या कामाचा शोध घ्या. अडीअडचणी सोडवा. भविष्यात संघटना अधिक मजबूत करूया असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा ११ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला कॅम्प येथील बॅ नाथ पै समुदाय केंद्र येथे संपन्न झाली. यावेळी सचिन वालावलकर बोलत होते. या सभेत शहरात रिक्त असलेल्या शाखाप्रमुखांच्या नेमणुका झाल्या तसेच महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. महिला शहरप्रमुख म्हणून रोहिणी सचिन सातार्डेकर यांच्या नावाची घोषणा शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केली.
यावेळी तालुकाप्रमुख बाळा दळवी, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, सत्यवान साटेलकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, पं स माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुचिता वजराटकर, पं स सदस्य साक्षी नार्वेकर, नगरसेविका समिधा रेडकर व लिना म्हापणकर, शितल साळगावकर, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती झालेले बाळा दळवी यांनी तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळात मोहीम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.










