
वेंगुर्ला : आजगाव, आसोली पंचक्रोशीत नागरिकांचा विरोध असूनही मायनिंग प्रकल्पासाठी वारंवार सर्व्हेक्षण होत आहे. स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न वेंगुर्ला तालुका टिकून राहावा यासाठी हा प्रकल्प होता नये. पंचायत समिती सदस्य संकेत धूरी यांचे अभिनंदन करतो की न्हैचीआड याठिकाणी होत असलेले मायनिंग सर्व्हेक्षण त्यांनी हाणून पाडले. अशाच प्रकारे नागरिकांच्या भावना लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत मायनिंग प्रकल्प होता नये असा ठराव सभापती शंकर घारे यांनी आजच्या पंचायत समिती मासिक सभेत मांडला. तसेच या सभेची प्रत मायनिंग डिपार्टमेंट व जिल्हाधिकारी यांना द्यावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती सचिन देसाई, प्रभारी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, योगिता परब, शीतल राऊत यांच्या सहित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.











