LIVE UPDATES

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहरात समाजोपयोगी उपक्रमांची मालिका

आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य, दप्तर, छत्री व वृक्ष वाटपाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 14:07 PM
views 36  views

देवगड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नितेश राणे यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष देवगड-जामसंडे शहराच्या वतीने संपूर्ण शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा देवगड-जामसंडे शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून मच्छीमार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असून शहरभर सेवा आणि जनकल्याणाचा संदेश दिला जाणार आहे.

मत्स्य विभागाच्या योजनांचे शिबिर

रविवार दि. २१ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे मत्स्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा देवगड-जामसंडे शहरातील मच्छीमार बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आणि युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील यांनी केले आहे.

दि. २२ जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आणि माजी नगरसेवक संजय तारकर यांच्या सौजन्याने सोमवार दि. २२ जून रोजी सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.दि. २३ जून रोजी होणारे विविध उपक्रम मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २३ जून रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देव ब्राम्हणदेव मंदिर येथे सकाळी ८ वाजता नितेश राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात येणार आहे.श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदिर येथील पाच गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा वर्षभराचा संपूर्ण शैक्षणिक खर्च भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या सौजन्याने करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये नगरसेविका ऋचाली दिनेश पाटकर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा खाकशी आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये नगरसेविका मनिषा जामसंडेकर यांच्या वतीने प्रबुद्ध नगर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आणि नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या वतीने देवगड-जामसंडे शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ५०० दप्तरांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा मळई येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.स्वच्छता व आरोग्य सभापती नगरसेवक बुवा तारी आणि नगरसेवक संतोष तारी यांच्या वतीने शहरातील मच्छी विक्रेत्या महिलांना छत्री वाटप करण्यात येणार असून मच्छीमार बांधवांसाठी विमा संरक्षण पॉलिसीही सुरू करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील महिलांना छत्री वाटप करण्यात येणार आहे.उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १० मधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद किल्ला शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये योगेश पाटकर यांच्या वतीने नागरिकांना छत्री वाटप करण्यात येणार आहे. नगरसेविका आद्या गुमास्ते यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वृक्ष वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा भटवाडी, बेलवाडी तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील बूथ क्रमांक ७३ च्या वतीने जिल्हा परिषद शाळा तारामुंबरी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना अजित गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ तसेच शहरातील आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख आणि बूथ अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.