LIVE UPDATES

कोंबड्या वाहतूक करणाऱ्या चालकाचं नशेच्या धुंदीत धुमशान

एकाचवेळी कारसह चार बाईक उडवल्या
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 16:23 PM
views 221  views

संतप्त नागरिकांनी दिला चोप 

दोडामार्ग : गजबजलेल्या साटेली - भेडशी बाजारपेठ मध्ये बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बाॅयलर कोंबडया वाहतूक करणाऱ्या मधुधुंद चालकाने दारुच्या नशेत साटेली भेडशी बाजारपेठ मध्ये युको कार सह चार वाहनाना धडक दिली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. पण पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला चालक समोर वाहन आल्याने चांगलाच तावडीत सापडला संतप्त नागरिकांनी चांगला चोप देऊन कोंबडया वाहतूक गाडी आरोग्य केंद्र आवारात अडवून ठेवली. जोपर्यंत झालेले नुकसान मिळत नाही तोपर्यंत सोडणार नाही असा पवित्रा लोकांनी घेतला. 

   घाटमाथ्यावरील वीस ते पंचवीस वाहने सर्व नियम धाब्यावर बसवून कोंबडया वाहतूक दोडामार्ग तसेच गोवा राज्यात करतात दिवसरात्र वाहने चालतात हे चालक गोवा येथून मद्यपान करून येतात पण दोडामार्ग पोलीस कारवाई करत नाही किंवा तपासणी करत नाही. 

   बुधवारी रात्री साडेसात वाजता गोवा येथे कोंबडया खाली करून काही कोंबडया घेऊन पुन्हा साटेली भेडशी बाजारपेठ येथून घाटमाथ्यावर जायला निघालेल्या कोंबडया वाहतूक चालकाने साटेली भेडशी बाजारपेठ मध्ये वाहनांना धडक देत देत हंगामा केला. रस्ता कडेला उभी युको कार तसेच चार दुचाकी वाहने याना धडक देऊन नुकसान केले. 

  यावेळी तसाच पुढे पळण्याचा प्रयत्न करताना समोर वाहन आल्याने चांगलाच हातात मिळला यामुळे संतापलेल्या युवकांनी आपले हात साफ करून घेतले यावेळी कोंबडया वाहतूक वाहनात दोघे जण होते.  संतप्त नागरिकांनी चालकाची नशा उतरून ठेवली. अखेर काही जणांनी नुकसान भरपाई द्यावी यासाठी चर्चा सुरू होती. या धडकेत वाहनांचे नुकसान झाले, दोन तीन जणांनी गाडी बाहेर मारल्याने जीव वाचला.  बेकरी जवळ चार दुचाकी उडवल्या.