
कणकवली : उद्धव ठाकरे उबाठा शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार होते. याच कारणामुळे त्यांच्या सहा खासदारांनी उबाठाला सोडचिठ्ठी दिल्याचा गौप्यस्फोट पालकमंत्री नीतेश राणेंनी केला. विलीनीकरणाबाबत राहुल गांधी व आदित्य ठाकरे यांच्यात बैठकाही झाल्या. आदित्य ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस बनवले जाणार होते, असेही राणे म्हणाले. शिवसेनेची काँग्रेस व्हायला देणार नाही ,असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मात्र उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्याच विचारांना तिलांजली दिली, असेही राणे म्हणाले.











