LIVE UPDATES

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 20:20 PM
views 65  views

कणकवली : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी फोंडाघाट व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा हा दिवस केवळ शुभेच्छा स्विकारण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, फोंडाघाट येथे केक कापून व शुभेच्छा कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.२० वाजता ग्रामपंचायत, फोंडाघाट येथे केक कापून संजय आग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. सकाळी १०.४५ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे विद्यार्थ्यांना टी-शर्टचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता मराठे कॉलेज, फोंडाघाट येथे आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक स्पर्धेचे उद्घाटन संजय आग्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे. युवा पिढीमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने या स्पर्धेला विशेष महत्त्व असून विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

दुपारी १२ वाजता असलदे वृद्धाश्रम येथे अन्नदानाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंद वाटून घेण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत संजय आग्रे हे मराठे कॉलेज, फोंडाघाट येथे सुरू असलेल्या आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देतानाच स्पर्धेचा उत्साह वाढविण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, संध्याकाळी ६ वाजल्यानंतर संजय आग्रे हे आपल्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देणार आहेत. सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्राला चालना आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंद वाटून घेत संजय आग्रे यांचा वाढदिवस यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.