LIVE UPDATES

नाधवडेत २५ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव

नियोजन बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 13, 2026 20:54 PM
views 46  views

वैभववाडी : नाधवडे येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात शनिवार, २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव समितीची नियोजन बैठक रविवारी दादर येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. बैठकीत उत्सवाचे नियोजन, विविध जबाबदाऱ्यांचे वाटप आणि कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

नाधवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी महोत्सव साजरा केला जाणार आहे.या निमित्ताने २५ जुलै रोजी पहाटेपासून श्री विठ्ठल-रखुमाईंची पूजा, अभिषेक, काकड आरती, दिंड्यांचे आगमन, महाप्रसाद, वारकरी भजन, हरिपाठ, कीर्तन आणि स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार असून रात्री शेजारतीने उत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाकरिता मुंबईत बैठक संपन्न झाली.या बैठकीत सजावट, ध्वनी व्यवस्था, महाप्रसाद, पूजा व धार्मिक विधी, समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी, निमंत्रण तसेच स्वयंसेवकांचे नियोजन, शिस्त व समन्वय यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुंबईस्थित नाधवडे गावातील ज्येष्ठ मान्यवर, ग्रामस्थ, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध व सुव्यवस्थित करण्यासाठी सूचना मांडल्या.यंदाचा उत्सव अधिक आकर्षक, सुव्यवस्थित आणि अविस्मरणीय करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. सर्वांनी जबाबदारीने कार्य करून उत्सव यशस्वी करण्याचे आश्वासन दिले.बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, ग्रामस्थ, युवक व कार्यकर्त्यांचे आषाढी एकादशी उत्सव समिती, नाधवडे यांच्या वतीने आभार मानण्यात आले.