LIVE UPDATES

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा गजाआड

कणकवली येथील घटना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 13, 2026 10:25 AM
views 332  views

कणकवली : येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला अखेर काही तासांमध्ये कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. अथर्व राणे (बिडवाडी वय 20) असे या  संशयित  चोरट्याचे नाव असल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली. दरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन चोरट्याला त्याच्या घराकडून शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान या चोरट्याने चोरीचा प्लान कसा केला  किंवा त्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी सदर चोरट्यावर गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयात  हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.