LIVE UPDATES

मिलिंद पवार पूर्व प्राथमिक शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात

देवगड - जामसंडेतील सहा शाळांमधील २९६ विद्यार्थ्यांचा सहभाग
Edited by:
Published on: July 13, 2026 20:40 PM
views 31  views

देवगड :  देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेत चित्रकार प्रथमेश राजेंद्र हिंदळेकर (बालविभाग) यांच्या जन्मदिनानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील सहा शाळांतील एकूण २९६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन माजी पर्यवेक्षक राजेंद्र हिंदळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, शाला समिती अध्यक्ष शिंगाडे सर, माजी मुख्याध्यापक राऊत सर, स्थानिक समिती सदस्य, शेठ म. ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.