LIVE UPDATES

नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त योग शिबिरासह विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 21:59 PM
views 26  views

वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोकिसरे जिल्हा परिषद, वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई आणि पतंजली योग समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुन रावराणे विद्यालय येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या योग शिबिरात शिक्षक विजय मरळकर, संदेश तुळसणकर, संगिता पाटील तसेच पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध योगासने व प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनीही या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

वंदे मातरम् गीताने योग शिबिराची सांगता करण्यात आली.यानंतर जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे  यांच्या उपस्थितीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. नितेश राणे यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी उपस्थितांनी प्रार्थना केली.यावेळी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तकांचे तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले. हे वाटप वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाला वैभववाडी संस्थेचे संचालक विजय रावराणे, मुख्याध्यापक भास्कर नादकर, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माता पालक संघाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, पतंजली योग समितीचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.