LIVE UPDATES

सिंधुदुर्ग पर्यटन विभागाची लक्तरे वेशीवरती टांगलीत

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची तीव्र नाराजी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 12:55 PM
views 327  views

सावंतवाडी : आंबोली मुख्य धबधबा हे ठिकाण पर्यटनाचा हॉटस्पॉट असून देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र, पर्यटन विभागाने येथील सुरक्षेसाठी उभारलेले बांबूच सुरक्षा कवच म्हणजे सिंधुदुर्ग पर्यटन विभागाची लक्तरे वेशीवरती टांगतायत, अस मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.

हा प्रकार म्हणजे पर्यटन विभागाची  लक्तरेच वेशीवर टांगण्या सारखा आहे. इथला परिसर गलिच्छ झाला आहे. सिंधुदुर्ग वनविभाग, सिंधुदुर्ग पर्यटन विभागान याची तात्काळ दखल घ्यावी. पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे‌. परंतू, सिंधुदुर्ग पर्यटनाची लक्तरे वेशीला टांगल्यासारखी दिसू नयेत असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.