LIVE UPDATES

आज नीट पुनर्परीक्षा

; कणकवली परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 11:41 AM
views 172  views

कणकवली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पुनर्परीक्षा आज कणकवलीतील परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थ्यांची लगबग आणि धावपळ सुरू झाली आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. परीक्षार्थींना वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुलांच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाची परीक्षा असल्याने पालकांमध्येही उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवावे तसेच परीक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. करण्यात आला आहे. कणकवली कॉलेजमध्ये हे परीक्षा केंद्र आहे. जिल्हा शिक्षण विभाग, प्रशासन तसेच पोलीस विभाग सतर्क असून काटेकोरपणे परीक्षा व्हावी, त्यात पारदर्शकता असावी, यासाठी सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी पोलीस पथकाद्वारे करण्यात आली आहे.