LIVE UPDATES

सरकारी इमारतीचे नुकसान

दोघांवर गुन्हा दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 04, 2026 20:57 PM
views 30  views

वैभववाडी : तहसील कार्यालयासमोरील संक्रमण इमारतीच्या खिडकीचे गज तोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्योतिबा तुकाराम गावडे (वय ३६) आणि राम परशुराम गावडे (वय ५५, दोघे रा. बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी तलाठी केदारी बाळासाहेब बागल यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयासमोरील संक्रमण इमारतीत हे दोघे खिडकीचे लोखंडी गज तोडत असल्याचे एका नागरिकाच्या निदर्शनास आले. संबंधित नागरिकाने तत्काळ ही बाब तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी केदारी बागल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ज्योतिबा गावडे आणि राम गावडे यांच्याविरुद्ध सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार आरती राठोड करीत आहेत.