
सिंधुदुर्ग : शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल असे प्रलोभन दाखवून तब्बल १,२४६ गुंतवणूकदारांची सुमारे १८५ कोटी रुपयांची फसवणूकीतील संशयित सचिन राणे अद्याप मोकाट आहे. यातील सागर कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी एका वेगळ्या प्रकारणात ताब्यात घेतल्यानंतर ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर सचिनची पत्नी प्रिती राणेला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, तीचा नवरा सचिन राणे अद्याप मोकाट आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात सचिन राणे आणि सागर करिवडेकर यांच्याविरुद्ध ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हे दाखल आहेत. मात्र, यांची सचिन राणे हा आरोपी अद्याप फरार आहे. यातच गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे हिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून तीला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलाची जबाबदारी तीच्या आईनं स्वीकारल्यानंतर तीला कारागृहात रवाना करण्यात आले आहे. ठाण्यातील एका सोसायटी परिसरात सचिन राणे आणि त्यांची पत्नी प्रीती राणे यांनी शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते. गुंतवणूकदारांना दरमहा चार ते पाच टक्के परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते. गुंतवलेली रक्कम सागर करिवडेकरच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात यायची, विश्वास निर्माण करण्यासाठी करिवडेकरसोबत सामंजस्य करार करण्यात आला होता. ज्यावर सचिन राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून स्वाक्षरी केली होती. यानंतर या पैशांचा मोठा हिस्सा आरोपींच्या नातेवाइकांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचा आरोप आहे. यातील दोघांवर कारवाई होत असताना तिसरा सचिन राणे अद्याप मोकाट असल्याने त्याच्या मुसक्या कधी आवळल्या जातात याकडे लक्ष लागून राहिले आहे.












