
सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल- धवडकी येथील एका हॉटेलजवळ डंपर आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात आज दुपारच्या सुमारास झाला. बेळगाववरून वेंगुर्लेच्या दिशेने ही कार जात असताना डंपर आणि कार यांच्यात अपघात घडला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताचा पंचनामा पोलीस करीत आहेत.











