LIVE UPDATES

सदगुरू गावडे काका महाराजांचे कार्य उल्लेखनीय

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक : अध्यात्मीक सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या कार्याचा घेतला आढावा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 18:45 PM
views 32  views

कुडाळ : तालुक्यातील माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन स्वामींचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी श्री श्री 108 महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज  यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अध्यात्मीक सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या कार्याचा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आढावा घेतला. यावेळी सदगुरू श्री गावडे काका यांच्या संकल्पनेतून अवघ्या 85 दिवसात साकालेला श्री स्वामींचा मठ, त्यात प्रतीष्ठापीत केलेली श्री स्वामींची मुर्ती जी कृष्णशिला दगडात अवघ्या 28 दिवसात श्री स्वामींच्या आशिर्वादाने बनविलेली आहे ती श्री स्वामी समर्थाची मूर्ती ही वैशिष्ठ पूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. हे मंदीर सपुर्ण भारत देशात प्रसिध्दीस आले आहे. हजारो भावीक रोज येथे येऊन श्रींचे दर्शन घेत आहेत. गावडे काकांनी स्वामी नामाची गोडी भावीकांना लावून एक चैतन्यमय गोडवा प्रत्येकाच्या ह्रदयात पसरविलेला आहे. स्वामींच्या दर्शनास येणा-या प्रत्येक भक्तगणाची विचारपुस करून, त्यांना गावडे काकांनी केलेले मार्गदर्शन भाविकांच्या जिवनात प्रकाशमान व गतिशिल ठरत असल्याचे सांगितले.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले सदगुरू गावडे काकांनी संस्थापीत केलेल्या श्री सदगुरू भक्त सेवा ऩ्यास, रजी. माड्याचीवाडी  धार्मिक व  सामाजिक संस्था सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर ठरत आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ मान्यता प्राप्त व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातू योगा अभ्यास वर्ग गेली तीन वर्षे सुरू आहे.100 योग शिक्षक संस्थेने घडवीले आहेच. त्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.

केंद्र सरकारच्या निक्षय भारत योजनेत सहभागी होऊन 80 क्षयरोग रूग्णांना सतत दोन वर्षे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पौष्टीक आहार देण्यात आला. या कार्याचा गौरव म्हणून सदगुरू गावडे काका महाराजांना  केंद्र सरकारच्या वतीने निक्षय मित्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले ही अभिमानाची गोष्ट आहे. माड्याचीवाडी या छोटाशा गावात  श्री सदगुरू भक्त सेवा न्यास व महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून शासन मान्य योग अभ्यास वर्ग सुरू असून आत्ताच संस्थेला एम. ए योगाची मान्यता मिळाली असुन हे योगा कॉलेज सदगुरू गावडे काकांच्या संकल्पनेतून साकारले हे गावडे काकांचे कार्य उल्लेखनीय आहे असे गौरवौदगार काढले.