LIVE UPDATES

'कोकणसाद LIVE' ची 'गगनभरारी'

कोकणच्या लाल मातीशी, इथल्या निसर्गाशी, कष्टकरी लोकांशी आणि त्यांच्या भावनांशी अतुट नातं जपत प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या 'कोकणसाद LIVE' या महाचॅनेलने यशोशिखरावर आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. गेल्या १२ वर्षांपासून कोकणच्या समस्या, संस्कृती आणि घडामोडींना वाचा फोडणाऱ्या या चॅनेलने युट्यूबवर ४ लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 11:44 AM
views 69  views

सिंधुदुर्ग : डिजिटल माध्यमांच्या विश्वात असा ऐतिहासिक टप्पा गाठणारे 'कोकणसाद LIVE' हे कोकणातील नंबर १ चे अग्रगण्य महाचैनेल ठरले आहे. 'कोकणसाद LIVE' हे केवळ बातमी देणारं माध्यम उरलेलं नसून तो प्रत्येक कोकणवासीयाचा आवाज, विश्वास आणि हक्काचं हक्काचे व्यासपीठ बनले आहे. स्थानिक प्रश्नांची तड लावणं असो, सत्य घटनांची आक्रमक मांडणी असो वा कोकणच्या समृद्ध लोककलेचा आणि संस्कृतीचा जागर असो 'कोकणसाद' ने नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गेल्या एका तपाहून अधिक काळ कोकणातल्या तळागाळातील बातम्या सातत्याने आणि निष्पक्षपणे जनतेसमोर मांडल्या. हा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर चॅनेलचे मुख्य संपादक सागर चव्हाण आणि संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

हा ४ लाखांचा टप्पा म्हणजे कोकणवासीयांनी आमच्यावर दाखवलेल्या अथांग विश्वासाचे प्रतीक आहे. प्रेक्षकांच्या या अफाट प्रेमामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. भविष्यातही सामाजिक बांधीलकी जपत कोकणच्या विकासासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमचीलेखणी आणि कॅमेरा असाच तत्पर राहील," अशी ग्वाही चॅनेलच्या वतीने देण्यात आली. युट्यूबवरील या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून, राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांकडून 'कोकणसाद LIVE' टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

"कोकणच्या मातीशी, माणसांशी आणि त्यांच्या भावनांशी नातं जपत विश्वासाची पत्रकारिता करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आज ४ लाखांहून अधिक कोकणवासीयांच्या विश्वासाच्या रूपाने उभा आहे. कोकणचं नंबर १ महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' हा केवळ एक न्यूज चॅनेल नाही, तर कोकणवासीयांचा आवाज, विश्वास आणि हक्काचं व्यासपीठ आहे. आमच्या प्रत्येक बातमीमागे सत्याचा शोध, प्रत्येक LIVE मागे जनतेचा आवाज, आणि प्रत्येक प्रयत्नामागे कोकणाच्या विकासाची तळमळ आहे. ४ लाखांचा टप्पा ही आमच्यासाठी केवळ एक संख्या नाही, हा आहे ४ लाख कोकणवासीयांनी दिलेला विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद ! या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक कोकणवासियांचे, प्रेक्षकांचे, वाचकांचे, जाहिरातदारांचे, हितचिंतकांचे, प्रतिनिधींचे आणि 'कोकणसाद LIVE' च्या प्रत्येक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !"

सागर चव्हाण, मुख्य संपादक, कोकणसाद LIVE

कोकणच्या मातीतील आणि कोकणवासीयांच्या मनातील विश्वास जपणाऱ्या 'कोकणसाद लाईव्ह 'ने आज ४ लाख सबस्क्रायबर्सचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला, ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कोकणचा आवाज म्हणून तुम्ही जी भूमिका पार पाडत आहात, शेतकऱ्यांचे, मच्छिमारांचे, युवकांचे प्रश्न तुम्ही ज्या ताकदीने मांडता, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. कोकणचं नंबर १ महाचॅनेल म्हणून मिळालेली ही पावती तुमच्या प्रामाणिक कामाची पोचपावती आहे. कोकणसाद लाईव्हच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या हातून अशीच निर्भीड पत्रकारिता घडत राहो आणि लवकरच १० लाखांचा टप्पा गाठा, यासाठी मनापासून शुभेच्छा.

-अजय कांडर, कवी आणि प्रसिद्ध स्तंभलेखक

कोकणातील निर्भीड पत्रकारितेचा वारसा जपत 'कोकणसाद लाईव्ह'ने ४ लाख सबस्क्राईबर्सचा ऐतिहासिक टप्पा पार केला, ही अभिमानाची बाब आहे. अचूक आणि निर्भीड पत्रकारितेचे समीकरण म्हणजे कोकणसाद ! या यशाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

- संजय तांबे, सेवानिवृत्त अधिकारी फोंडाघाट, ता. कणकवली