LIVE UPDATES

कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी येथे वृक्षारोपण

सविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन : काळप नाका ते गुलमोहर हॉटेलपर्यंत स्वच्छता अभियान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 20:32 PM
views 26  views

कुडाळ : जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी येथे वृक्षारोपण व काळप नाका ते गुलमोहर हॉटेलपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान सविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या वतीने राबविण्यात आले. तसेच सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करण्यात आली. यावेळी सविता आश्रम संस्थापक संदीप परब, रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, नगरपंचायत गटनेता विलास कुडाळकर तसेच रोटरी क्लबचे रविंद्र परब, राजन बोभाटे, गजानन कांदळगावकर, राकेश म्हाडदळकर, माजी नगरसेवक सचिन काळप शैलेश काळप व सविता आश्रमचे कर्मचारी उपस्थित होते.